हृदयद्रावक! गर्भवती महिलेचा मृत्यू अन् बाळही दगावलं; कारण…

छत्रपती संभाजीनगर : वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाल्याची घटना विहामांडवा (ता. पैठण) येथे घडली आहे. या प्रकरणी मृत गर्भवती महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे.

स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर नऊ महिन्यांची गर्भवती होती. सहा सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर तिच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झालं होते. गर्भातील गुंतागुंत वाढत असल्याचे कळताच डॉक्टरांनी तातडीने सिझर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, उपचाराचा खर्च करण्यास सासरच्यांनी नकार दिला. महिलेच्या माहेरच्यांनी उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवली. मात्र, तरीही तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. अखेर प्रकृती गंभीर झाल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी तिला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वातीने श्वास सोडला. तिच्या पोटातील 9 महिन्यांचे बाळही दगावले.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या (सर्व रा. विहामांडवा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्रेमविवाहानंतर पोलिसाने गर्भवती असलेल्या कमांडो पत्नीला संपवलं…

पुणे! प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती अन् ससूनमध्ये…

प्रेमविवाह केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या गर्भवती मुलीने संपवलं आयुष्य…

सांगली! गर्भवती महिलेची आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर…

गर्भवती पत्नीला डोळे बंद करायला लावले अन् केला विश्वासघात…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!