गुवाहाटीच्या नाईटक्लबमध्ये महिलेचा विनयभंग; विवस्त्र करून मारहाण; बाऊन्सर्सवर आरोप…

गुवाहाटीः शहरातील खानापारा भागातील एका नाईटक्लबमध्ये, गुरुवारी रात्री उशिरा एका महिलेवर हल्ला करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. बाऊन्सर्सनी तिला विवस्त्र करून मारहाण केल्याचाही आरोप आहे. ही घटना ‘द लोकल्स कॅफे अँड लाउंज’ येथे घडली आहे. पोलिसांनी क्लबच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेतल्याची माहिती, पोलिसांनी दिली. या महिलेची ओळख पटू शकली नाही.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यामध्ये ती महिला पार्किंग परिसरात जमिनीवर नग्न अवस्थेत पडलेली दिसत आहे. दोन महिला तिला लाथा मारताना दिसत असून, अनेक पुरुष जवळच उभे आहेत. पोलिसांनी क्लब मॅनेजरला ताब्यात घेतले आहे.

इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने सांगितले की, ती महिला तिच्या काही मित्रांसोबत क्लबमध्ये आली होती. क्लबमध्ये तिने एका बाउन्सरवर बिअरच्या बाटलीने प्रहार केला. त्यानंतर इतर बाऊन्सर्सनी त्याला पकडले आणि चौथ्या मजल्यावरून खाली पार्किंग एरियामध्ये आणले. मात्र, हा वाद कशामुळे आणि का सुरू झाला हे समजू शकले नाही.

सुरक्षारक्षकाच्या म्हणण्यानुसार, तिला पार्किंग लॉटमध्ये आणल्यानंतर बाउन्सर्सनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचे कपडेही काढून टाकले. एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचे चित्रीकरण केले. व्हिडिओमध्ये काळी पँट घातलेली एक महिला, अर्धनग्न अवस्थेत जमिनीवर पडलेली दिसत आहे. दोन महिला तिला लाथा मारताना दिसत आहेत.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, एक पुरुष एका महिलेला आपल्या हातांनी उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यानंतर एक गाडी जवळून जाते, ज्यामुळे क्षणभरासाठी कॅमेऱ्याचे दृश्य अस्पष्ट होते. त्यानंतर ती महिला दिसेनाशी होते, तर अनेक पुरुष एकमेकांशी बोलताना दिसतात.

पूर्व गुवाहाटीचे डीसीपी तबू राम पेगू यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी क्लब व्यवस्थापकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडितेची ओळख अद्याप पटलेली नाही. डीसीपी म्हणाले की, जर महिलेने तक्रार दाखल केली नाही, तर पोलीस स्वतःच गुन्हा दाखल करू शकतात. या घटनेनंतर क्लब बंद बंद करण्यात आला आहे.

क्लब व्यवस्थापनाने या प्रकरणावर अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!