IPS अधिकाऱ्याचे कौतुक! पहिल्या पगाराचे काय केले पाहा….
हैदराबाद : हैदराबादमध्ये आयपीएस प्रशिक्षण घेत असलेल्या बाडमेरचे आयपीएस अधिकारी आशीष पूनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला आहे. आशीष पूनिया यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आशिष पुनिया यांनी ऑगस्ट महिन्यातील आपला पहिला पगार बाडमेरच्या 50 विलेजर्स या संस्थेला दान दिला. याबाबत त्यांनी लिहिले की, ‘भरत जी सर (50 विलेजर्स संस्थेचे संचालक), मी ऑगस्टमध्येच भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) रुजू झालो. आम्ही सर्व आमचा पहिला पगार धर्मादाय कार्यात देतो. यापेक्षा चांगली संधी मला वाटत नाही. कृपया, हे स्वीकारा आणि आमचा आत्मविश्वास सदैव कायम राहो.’
आशिष पुनिया यांनी अगदी सोप्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करत आपला पहिला पगार सर्वात कठीण परीक्षांपैकी एक नीट ही परीक्षा पास करणाऱ्या तरुणांना दिला आहे. 50 विलेजर्स संस्थेचे डॉक्टर भरत म्हणाले की, असे खूप कमी अधिकारी असतात जे आपला पगार दान करतात. त्यांनी हा पगार निःशुल्क डॉक्टर बनवणाऱ्या संस्थेला दान दिला आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. आशिष पुनिया यांनी आपला पगार 51 हजार 251 रुपये मुलींच्या शिक्षणाच्या क्षेत्रात दान करून आदर्श उदाहरण प्रस्तुत केले आहे.’
दरम्यान, आशीष पुनिया हे बाडमेरच्या गुडामालानी येथील पायला कला येथील रहिवासी आहेत. त्यांनी यूपीएससी परिक्षेत 557 रँक प्राप्त केली होती. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले. यूपीएससी पास केल्यावर त्यांना आयपीएस कॅडर मिळाले आहे. त्यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी आहेत. आशीष यांनी बारावीचे शिक्षण कुचामन सिटी यानंतर दिल्लीत राहून दृष्टि संस्थेच्या माध्यमातून कोणताही क्लास न लावता यूपीएससीची तयारी केली होती. त्यांना 10 वीत 90 तर 12 वीमध्ये 91 टक्के गुण मिळाले होते. आशिष पुनिया यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी
शब्बीर सय्यद: कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील: कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
पौर्णिमा तावरे: व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले!
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
अशोक इंदलकरः लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…