
हाय प्रोफाईल चोर! पुणे शहरात विमानाने येऊन चोरी करणारी टोळी गजाआड…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात येऊन चोरी करून पसार होऊ पाहणाऱ्या एका टोळीला बंडगार्डन पोलिसांनी ताब्यात घेत त्यांचा पर्दाफाश केला आहे. आरटीओ जवळ असलेल्या रिलायन्स फॅशन फॅक्ट्री मॉल येथे चोरी करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चोरांची ही टोळी राजस्थानातून चक्क विमानप्रवास करत पुणे शहरात आल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.
गौरव कुमार रामकेश मीना (वय 19), बलराम हरभजन मीना (वय 29), टोळीचा म्होरक्या, योगेश कुमार लक्ष्मी मीना (वय 25) आणि सोनू कुमार बिहारीलाल मीना (वय 25) या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेले चारही जण राजस्थानचे रहिवासी असून, त्यांनी मॉलमधून कपडे आणि बुटांसह साधारण 1.54 लाख रुपयांच्या वस्तू चोरल्याचे उघड झाले आहे.
पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?
सुरक्षा रक्षकाने घटनास्थळावरून पळ काढण्य़ाचा प्रयत्न करणाऱ्या दोन चोरट्यांना रविवारी सायंकाळी अडवलं आणि तिथंच त्यांचा डाव फसला. पुढं तपासासून मॉलनजीक असणाऱ्या एका पेट्रोल पंपावर उभ्या असणाऱ्या कारमधून त्यांनी चोरलेल्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तातडीनं तपास यंत्रणांना सूचना केल्या आणि या टोळीच्या म्होरक्याला खडकी बाजारातील एका हॉटेलातून ताब्यात घेण्यात आले. तर, सोनू मीनाला पुणे रेल्वे स्थानकावर हटकण्यात आले. दरम्यान, पुण्यातील बंडगार्डन पोलिसांत यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या चोरीच्या दोन तक्रारींचे धागेदोरेही याच टोळीशी जोडण्यात आले.
विमान प्रवास करत जयपूरहून मुंबईत टोळी दाखल झाली. त्यांनी नोंदणी नसणाऱ्या दुचाकी एका अॅपच्या माध्यमातून बुक केल्या. एखाद्या मोठ्या दुकानात ग्राहक म्हणून जात चेंजिंग रुममध्ये गेल्यावर तिथे कपड्यांवरील बारकोड काढत त्यांनी हळुहळू अनेक गोष्टी लंपास केल्याचे तपासातून समोर आले आणि या हाय प्रोफाईल चोरांचे बिंग फुटले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…
पुणे शहरात घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद…
पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार…
धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

