माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…
अकोला : एका पाच वर्षीय मुलीला तिच्या आईनेच मारल्याची धक्कादायक घटना घडली असून, माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्येय आला आहे. किशोरी रवी आमले असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव असून विजया आमले असे तिच्या आईचे नाव आहे. पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली आहे.
अकोला शहरातील बलोदे ले-आउटमध्ये राहणाऱ्या रवी आमले यांनी मुलीच्या मृत्यूनतंर पोलिसात पत्नीविरोधात तक्रार दिली. रवी आमले यांना पाच वर्षांची किशोरी नावाची मुलगी होती. त्यांची पत्नी नेहमीच त्यांच्या आईसोबत वाद घालायची. कुटुंबापासून वेगळं राहण्यासाठी भांडत असे. त्यामुळे ते हिंगणा येथे भाड्याची खोली करून राहात होते. रवी आमले हे 2 जून रोजी दुपारी जेवण करण्यासाठी घरी आले त्यावेली किशोरी क्लासवरून घरी आली. त्यानंतर रवी आमले आणि किशोरी सोबत खेळले जेवण केले आणि कामावर निघून गेले होते.
पत्नीचा फोन आला की किशोरी पलंगावर खेळता खेळता झोपली ती उठत नाही. तिला दवाखान्यात नेले, तिथे डॉक्टरांनी ती मरण पावल्याचे सांगितले. त्यानंतर रवी आमले यांनी तक्रार दाखल केली. पत्नी लग्नापासून वाद घालायची, घटस्फोटाची मागणी करायची, त्यामुळे पत्नीनेच मुलगी किशोरीच्या नाकाला प्लास्टिक चिमटा लावला आणि त्यामुळे तिचा गुदमरून मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला होता. या प्रकरणी खदान पोलिसांनी 302 चा गुन्हा दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…
माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…
दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…
हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…