अभिनेता आमिर खानच्या एक्स पत्नीचे शारीरिक संबंधाबाबत बोल्ड वक्तव्य…
मुंबईः अभिनेता आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव हिने शारीरिक संबंधाबाबत बोल्ड वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आली आहे. आधीची पिढीच्या तुलनेत आजची तरुण पिढी प्रेमसंबंधांकडे कशाप्रकारे पाहते, यावर आपले मत व्यक्त केले आहे. ‘लस्ट स्टोरीज 3’च्या प्रोमोशनवेळी बोलताना किरण राव म्हणाली की, ‘मला स्वातंत्र्याची भावना जाणवते. माझ्या पिढीच्या तुलनेत आजच्या तरुण पिढीमध्ये स्वातंत्र्याची भावना आहे. […]
अधिक वाचा...पुणे! कात्रज-कोंढवा रस्त्यावर दगडाने डोक्यात वार करून युवकाचा खून…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात जेवणाचे पैसे न दिल्याच्या कारणातून झालेल्या वादात तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता ४) दुपारी घडली आहे. या प्रकरणी कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तुषार राजू वाल्हेकर (वय २९, […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पैठणमध्ये भीषण अपघात बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : पैठण येथे अरुंद रस्त्यावरील वळणावर नियंत्रण सुटल्याने एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बापलेकीसह एका नातेवाइकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताचा सीसीटीव्ही देखील आता समोर आला आहे. कृष्णा अशोक गायकवाड (२५), त्यांची पाच वर्षाची मुलगी छकुली कृष्णा गायकवाड […]
अधिक वाचा...महाराष्ट्राला हादरला! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर लॉजवर सामूहिक अत्याचार…
सांगली: सांगली जिल्ह्याच्या ईश्वरपूर शहरात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर (वय २०) सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शार्दुल विद्यापती पाटील (वय २१, रा. रेठरेधरण) आणि प्रथम सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) असं […]
अधिक वाचा...ज्ञानेश कुमार यांच्या केरळममधील कारकीर्दीत २० वर्षांपूर्वीच्या आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीचे केरळम सरकारचे आदेश…
थिरुअनंतपुरमः एसआयआर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, केरळमधील काँग्रेस सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात, २० वर्षांपूर्वीच्या एका आत्महत्येच्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण, केरळमचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असलेले ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात, २००६ मध्ये केएसटीपी रस्ता प्रकल्पातील भ्रष्टाचाराचे आरोप आणि या प्रकल्पाशी संबंधित एका मलेशियाच्या सिव्हिल इंजिनिअरच्या […]
अधिक वाचा...महिला पत्रकाराच्या कथित विनयभंगाविरोधात आता सीजेपीची आघाडी; एसीपी विवेक भगत यांच्यावर कारवाईची मागणी…
नवी दिल्लीः एसीपी विवेक भगत यांनी एका महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याच्या आरोपांवरून, कॉकरोच जनता पक्षाने (सीजेपी) निषेध नोंदवला आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून दावा केला आहे की, पोलीस पीडितेला भेटण्यास तयार नाहीत. या पोस्टमध्ये सौरभ दास यांनी म्हटले आहे की, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर सीजेपीचे सदस्य उपस्थित […]
अधिक वाचा...पूर्णेकर हत्या प्रकरणी महत्त्वाच्या व्यक्तिंविरोधात पोलीस कारवाईची विरोधकांची मागणी…
ठाणे: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली, तरी हत्येशी संबंधित असल्याचे आरोप होत असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींविरोधात पोलीस कारवाई का होत नाही? असा प्रश्न शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी ठाण्यात उपस्थित केला. पोलीस दात नसलेल्या वाघासारखे का पाहात बसले आहेत? असे विचारून त्यांनी तपासाच्या दिशेबाबत प्रश्न उपस्थित केला. पूर्णेकर […]
अधिक वाचा...क्यूआर कोड, एआय व्हॉईससारख्या बनावट ॲप्सपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन…
मुंबईः क्यूआर कोड घोटाळा, एआय व्हॉईस स्कॅम, बनावट सरकारी ॲप्स आणि एआय आधारित ऑनलाईन नोकरी देणाऱ्या अॅप्सवरून होणाऱ्या वाढत्या सायबर गुन्ह्यांबद्दल, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी अनोळखी क्यूआर कोड स्कॅन करू नयेत आणि संशयास्पद लिकवर क्लिक करणे टाळावे, कारण यामुळे सायबर गुन्हेगार, नागरिकांचा डेटा चोरी करू शकतात. उपकरणांमधील ॲप्स अपडेट ठेवणे […]
अधिक वाचा...ह.भ.प महाराजावर लैंगिक शोषणचा गुन्हा दाखल होताच झाला फरार…
नाशिक: त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे यांच्यावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात लैंगिक शोषण, फसवणूक, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक करण्यात न आल्यामुळे नैराश्यातून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा...मिठी नदीतील गाळ काढण्याचा ६५ कोटी रुपयांचा घोटाळा; डिनो मोरियाची सहा तास चौकशी…
मुंबईः मिठी नदीतील गाळ काढण्याच्या सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी, अभिनेता डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी (ईओडब्ल्यू) संबंधित तपासासाठी सहा तास ६ तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. तपासादरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी, डिनो मोरियाला बोलावण्यात आल्याचे ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले. […]
अधिक वाचा...
