
पाकिस्तानवर डबल अटॅक! लाहोर विमातनळाजवळ तीन मोठे स्फोट…
लाहोर (पाकिस्तान): ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) पाकिस्तान सावरला नसताना आज (गुरुवार) सकाळी लाहोरमध्ये तीन मोठे स्फोट झाले आहेत. लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सलग तीन बॉम्बस्फोट झाले आहेत. या स्फोटानंतर पाकिस्तानकडून हालचालींना वेग आला आहे.
भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर हालचाली वाढल्या आहेत. भारताने केलेल्या हल्ल्याच्या 24 तासानंतर आता लाहोरमध्ये बॉम्बस्फोट झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. लाहोरमधील वॉल्टन रोडवर मोठ्या स्फोटांची मालिका ऐकू आली, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की ते स्फोटाचे स्वरूप आणि स्थान निश्चित करत आहेत. वॉल्टन विमानतळाजवळील लाहोरमधील गोपाळ नगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवर अनेक स्फोट ऐकू आले. लोक घाबरून घराबाहेर पळाले आणि धुराचे लोट पाहिल्याचे वृत्त आहे. ड्रोन द्वारे हा हल्ला केल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
लाहोर कॅन्टोन्मेंटकडे जाणाऱ्या वॉल्टन रोडवर ड्रोन हल्ल्यानंतर लाहोरमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. नागरिक घाबरून रस्त्यावर उतरले. असीम मुनीरच्या जिहादी धोरणांमुळे पाकिस्तानच्या रस्त्यांवर युद्धाला आमंत्रण मिळाले आहे, अशी चर्चा सध्या पाकिस्तानमध्ये सुरू आहे.
दरम्यान, भारताने केलेल्या लष्करी कारवाईअंतर्गत भारतीय हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डे उद्ध्वस्त झाले आहेत.
Operation Sindoor! दहशतवादी मसूद अझहर याला झाला पश्चाताप अन् लागला ढसाढसा रडू…
Operation Sindoor: कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी…
‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…
Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…
Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…
Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

