
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहे.
स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल. यापूर्वी 1971 च्या युद्धाच्या वेळेला झालेली मॉक ड्रील झाली होती. त्यानंतर देशात कधीच ती झालेली नाही. त्यामुळे भारत खरंच पाकिस्तान सोबत पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय, मॉक ड्रील म्हणजे काय? त्यात नेमके काय होणार? ती कशी होणार? हे जाणून घेऊयात…
फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’
मॉक ड्रिलमध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितल्या आहेत. त्यात हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना अलर्ट करणे. रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआऊट कसे करायचे? हल्ला झाल्यास पडझड झाली आणि काही दुखापती झाल्या तर त्यांना उपचार कसे करायचे किंवा दुखापतग्रस्तांची सेवा कशी करायची? त्यात विद्यार्थी नगरसेवक आणि एनसीसीचे छात्र यांचा सहभाग कसा असला पाहिजे? महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया आणि हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव, याप्रमाणे काही निर्देश देण्यात आले असून, मॉक ड्रील करण्यात येणार आहे.
देशात अशा पद्धतीचे मॉक ड्रील 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच होत आहे. आजच्या युगात बॉम्बिंग हे कुठेही होते. त्यामुळे पाकिस्तानच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक राज्यात मॉक ड्रील करणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःला कसे वाचवायचे हे अजून नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सरकारने उचललेले पाऊल हे अनेकांना सावध करणारे आहे. मात्र अनेक जणांच्या मनात तणाव देखील निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानमधील लोक अन्नधान्याचा साठा करत आहेत, तसे आपल्या येथे सुरू होण्याची शक्यता आहे.
भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

