गोंदिया जिल्ह्यात पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई…

गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई केली असून, 5 लाख 90 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गोंदिया जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती करून विक्री करीता हॉटस्पॉट ठरलेल्या तिरोडा येथील संत रविदास वॉर्ड, इंदिराटोली परिसरातील अवैध दारू निर्मिती करणार्यांचे धंद्यावर प्रभावी धाडी घालून अवैध दारू निर्मिती धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे, यांचे मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलिस स्टेशनचे प्रभारी देविदास कठाले, यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वात पो.ठाणे तिरोडा अंतर्गत परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध धाड कारवाई ची विशेष मोहीम दिनांक 22/08/2023 रोजी राबविण्यात आली, अवैधरित्या हातभट्टी लावून हा.भ.दारू निर्मिती करणाऱ्या मोहफुलाची दारू गाळणाऱ्या एकूण 5 धंदेवाईक इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा 12 (अ) अन्वये एका इसमावर सट्टापट्टीची जुगार कारवाई करण्यात आली.

धाड कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये
1. आशा राजेंद्र भोंडेकर राहणार संत रविदास वार्ड हिचे कडून 400 किलो मोहसळवा मोहाफुल रसायन किंमती 40,000/- रूपये
2. अखिल रहीम खान पठाण राहणार संत रविदास वार्ड याचे कडून हातभट्टी चे साहित्य व सळवा मोहफुल रसायन असा एकूण 1,06450/- रूपये
3. जयश्री सोविंदा बरेकर राहणार सिल्ली हिचेेकडून सडवा मोहफुल रसायन व हातभट्टी दारू असा एकूण 12,100/- रूपये
4. गोपी भैयालाल कुंभरे राहणार काचेवाणी याचेकडून एकूण – 1,71,550 /- रुपयेचे हातभट्टीचे साहित्य व सळवा मोहफुल रसायन
5. किरण राजेंद्र भालाधरे राहणार आंबेडकर वार्ड, तिरोडा याचेकडून हातभट्टीचे साहित्य व मोहसळवा किंमत रुपये 2,60, 300/- चा जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे 6. नयन सुनील नागरिकर राहणार भूतनाथ वार्ड याचे सट्टापट्टीचे धंद्यावर रेड करून त्याचे ताब्यातून सट्टापट्टीचे साहित्य व सटापट्टी घेऊन मिळवलेले पैसे असे एकूण 805 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

धाड कारवाई मध्ये एकूण किमती 5 लाख 90 हजार 400,/- रुपयांचा मुद्देमाल हातभट्टी दारू व सळवा मोहफुल रसायन व हातभट्टीचे साहित्य जप्त करून सळवा मोहफुल रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे. तसेच सट्टापट्टीचे कारवाई मध्ये एकूण 805 रुपये रोख व सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वरिष्ठांचे निर्देश आदेशाप्रमाणे सदरची धाड कारवाई पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे, सहायक पोलिस निरिक्षक अभिजित जोगदंड, यांचे नेतृत्वात महिला पोलिस फौजदार राधा लाटे, पो.हवा. बावणे, तिरपुडे, पो. शि. शिवराज शेंडे, अविनाश लोंढे, सौरभ देवगडे, डहारे, म.पो.शि. अभिलाषा वाल्दे यांनी केलेली आहे.

गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…

गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…

पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!