
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
पुणे (संदिप कद्रे): जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून, या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे दोघेही मित्र आपल्या परिवारासह जम्मू काश्मीरला फिरायला गेले आणि पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात दोघांचाही बळी गेला. संतोष जगदाळे त्यानंतर कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार त्यांच्या घरी दाखल झाले. त्यावेळी दोन्ही परिवारांनी त्या ठिकाणची विदारक घटना सांगितली. कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, दहशतवाद्यांनी कपडे काढून त्याला गोळ्या मारल्याचे सांगितले.
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर सांगितेल की, मारणारे चार जण होते. तिथे एक जण मुस्लीम घोडेवाला होता, त्याने त्यांना विचारलं या निष्पाप लोकांना का मारत आहात त्यांनी काय चुकी केली आहे. त्यानंतर त्याला कपडे काढून गोळ्या झाडल्या. तो मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, दहशतवाद्यांनी त्यालाही कपडे काढून त्याला गोळ्या मारल्या. आम्हाला अनेकांनी मदत केली, सैन्य दलाची देखील मदत झाली. पण ती उशिरा झाली. तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या, तुम्ही अजान वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हटले. पण, त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं. तिथे गेटवर एक मुस्लिम होता. तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता. त्यांनी काय चुकी केली आहे? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. आमचे घोड्यावाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते. ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर आम्हाला घ्यायला आले. त्यांचा मित्र बाजूला होता. त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला ‘अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?’ त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो.’
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

