
‘Operation Sindoor’ मोहिम नरेंद्र मोदी नव्हे तर कोणी राबवली पाहा…
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने बुधवारी (ता. ७) रात्री जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. पाकिस्तानविरुद्धच्या या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. हल्ल्याची वेळ ७ मे २०२५ रोजी रात्री १२:३७ वाजता निश्चित करण्यात आली होती. भारताने ९ ठिकाणांवर एकूण २४ क्षेपणास्त्र डागली आहेत. पण पाकिस्तानवरील इतक्या मोठ्या हल्ल्याचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला नव्हता, तर दुसऱ्या कोणीतरी घेतला होता. पंतप्रधान मोदींना केवळ हल्ल्याचा संपूर्ण प्लॅन सांगून त्यांच्याकडून मंजुरी घेतली होती. त्यानंतर एका व्यक्तीच्या अंतिम इशाऱ्यानंतर हा हल्ला करण्यात आला होती.
ऑपरेशन सिंदूर राबवण्याची सुरुवातीची जबाबदारी एनएसए प्रमुख अजित डोवाल यांनी घेतली. अजित डोवाल यांनी एका विशेष पथकासह या ऑपरेशनची जबाबदारी स्वीकारली. या ऑपरेशनसाठी एक अतिशय मजबूत टीम तयार करण्यात आली होती. ऑपरेशनच्या पहिल्या टप्प्यात, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कारवायांबद्दल गुप्तचर माहिती गोळा करण्यात आली. दहशतवाद्यांनी लपण्यासाठी जी ठिकाणं बनवली होती, ती सर्व ठिकाणं आयडेंटीफाय करण्यात आली.
भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या सर्व ठिकाणांवर बारकाईने लक्ष ठेवले होते. हल्ल्यासाठी ठोस योजना तयार केल्यानंतर, एनएसए अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्यापक सल्लामसलत केली. या हल्ल्यात फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर, एनएसए अजित डोवाल यांनी पुन्हा एकदा त्यांच्या कोअर टीमसोबत बैठक घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेल्या सूचनांनुसार, हल्ल्याची योजना पुन्हा एकदा अंतिम करण्यात आली. या हल्ल्यात एनटीआरओला महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. हल्ल्याच्या अंतिम प्लॅनसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी हल्ल्याला हिरवा कंदील दिला आणि डोवाल यांना अॅक्शन घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर, एका अतिशय लहान गटाला हल्ल्याची माहिती देण्यात आली. तसेच एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला. या नियंत्रण कक्षाची कमान पूर्णपणे एनएसए अजित डोवाल यांच्या हातात होती.
View this post on Instagram
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर
4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.
7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर
दरम्यान, भारतीय सैन्याने बुधवारी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक आणि मर्यादित हल्ले केले. ही कारवाई पूर्णपणे गैर-प्रक्षोभक होती आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य केले गेले नाही. हल्ले त्या ठिकाणी झाले जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती. सैन्याच्या एक्स (X) हँडलनुसार, हे ऑपरेशन केवळ 23 मिनिटांत पार पडले. पहाटे 1:28 ते 1:51 दरम्यान पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाले. अखेर सैन्याने 1:51 वाजता पुष्टी केली की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ‘न्याय झाला.’
Operation Sindoor Time Line :
1:28 AM: इंडियन आर्मीच्या अधिकृत हँडल ADGPI ने ट्विट केले: प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः। (प्रहारासाठी तत्पर, विजयासाठी प्रशिक्षित.) हे ऑपरेशनच्या सुरुवातीचे संकेत होते.
1:28 AM ते 1:51 AM दरम्यान: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्फोट झाले. विशेषतः मुजफ्फराबादसारख्या भागातील स्थानिक लोकांनी ग्रीड स्टेशन्सवर क्षेपणास्त्र हल्ल्यांविषयी सांगितले. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण होते.
1:51 AM: सैन्याने दुसरे ट्विट केले: #PahalgamTerrorAttack Justice is Served. Jai Hind
Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…
Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…
Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

