
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू तर 20 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात नौदलातील अधिकारी विनय नरवाल (वय २६) यांचाही मृत्यू झाला आहे. आठवडाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. पत्नीसोबत काश्मीरमध्ये फिरण्यासाठी आले होते. या घटनेने त्यांच्या गावी एकच शोककळा पसरली आहे.
विनय नरवाल दोन वर्षांपूर्वी नौदलात भरती झाले होते आणि सध्या लेफ्टनंट पदावर कार्यरत होते. विनय नरवाल यांनी आपल्या शौर्याने देशसेवेची सुरुवात केली होती. विनय यांचा 16 एप्रिल रोजीच विवाहसोहळा संपन्न झाला होता. दोन दिवसांपूर्वी विनय आणि हिमांशी त्यांच्या हनिमूनसाठी जम्मू आणि काश्मीरला गेले होते. मंगळवारी, जेव्हा ते बैसरन खोऱ्यात फिरत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी विनयवर गोळीबार केला. यामध्ये विनय नरवाल यांचा मृत्यू झाला.
दहशतवादी हल्ल्यात त्यांच्या मृत्यूंची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली. काही नातेवाईक हे तात्काळ श्रीनगरकडे रवाना झाले आहेत. विनय यांच्या निधनाची माहिती समजताच संपूर्ण भुसली गाव शोकसागरात बुडाले आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीतील तीन, पुण्यातील दोन तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील इतर काही पर्यटक देखील जखमी असल्याचीही माहिती आहे. संबंधित पर्यटक घोडेस्वारी करत असताना नाव विचारून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. मृतांमध्ये डोंबिवलीतील संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी, पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे आणि पनवेलमधील दिलीप देसले यांचा समावेश आहे.
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

