
Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…
नवी दिल्ली: भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय हवाई दलानं 100 किलोमीटर आत घुसून पाकिस्तान अन् दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हेभारताने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) हे नाव दिले असून, या नावानेच भारतीयांची मनं जिंकली आहेत.
भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी महिलांसमोर पुरुषांची हत्या करून महिलांचे कुंकू पुसले होते. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. पण, भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याच आल्यामुळे अनेकांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेने पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही. भारतीय सेनेनं या मोहिमेत बहावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पसचं अचूक लक्ष्य साधलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा जीव गेला आहे. अशातच ही मोहीम फत्ते करणाऱ्या भारतीय लष्कराचं देशभरातून कौतुक होत आहे.
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. भारताने केलेल्या हल्ल्यावेळी बहावलपूरमध्ये 200 हून अधिक मुरिदकेमध्ये 120 हून अधिक दहशतवादी, मुजफ्फराबादमध्ये 110 ते 130 दहशतवादी, कोटलीमध्ये 75 ते 80 दहशतवादी, सियालकोटमध्ये 90 ते 100 दहशतवादी, गुलपूरमध्ये 75 ते 80 दहशतवादी, भिंबरमध्ये 60 हून अधिक दहशतवादी, चाक अम्रूमध्ये 70 ते 80 दहशतवादी होते. भारताने थेट हल्ला केल्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा जागीच खत्मा झाला आहे.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर
4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.
7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर
दरम्यान, भारतीय सैन्याने बुधवारी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक आणि मर्यादित हल्ले केले. ही कारवाई पूर्णपणे गैर-प्रक्षोभक होती आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य केले गेले नाही. हल्ले त्या ठिकाणी झाले जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती. सैन्याच्या एक्स (X) हँडलनुसार, हे ऑपरेशन केवळ 23 मिनिटांत पार पडले. पहाटे 1:28 ते 1:51 दरम्यान पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाले. अखेर सैन्याने 1:51 वाजता पुष्टी केली की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ‘न्याय झाला.’
Operation Sindoor Time Line :
1:28 AM: इंडियन आर्मीच्या अधिकृत हँडल ADGPI ने ट्विट केले: प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः। (प्रहारासाठी तत्पर, विजयासाठी प्रशिक्षित.) हे ऑपरेशनच्या सुरुवातीचे संकेत होते.
1:28 AM ते 1:51 AM दरम्यान: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्फोट झाले. विशेषतः मुजफ्फराबादसारख्या भागातील स्थानिक लोकांनी ग्रीड स्टेशन्सवर क्षेपणास्त्र हल्ल्यांविषयी सांगितले. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण होते.
1:51 AM: सैन्याने दुसरे ट्विट केले: #PahalgamTerrorAttack Justice is Served. Jai Hind
View this post on Instagram
Operation Sindoor: भारताने केलेल्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले पाहा…
Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…
मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…
भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…
Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

