
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 नागरिकांचा बळी गेला आहे. या हल्ल्यात भारतीय नौदलाच लेफ्टनंट पदावर असलेल्या विनय नरवाल यांचाही समावेश होता.
विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांचे अवघ्या आठवडाभरापूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर हे दोघेही हनिमुनसाठी पहलगाल येथे आले होते. मात्र, दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळी घालून ठार केले. या हल्ल्यापूर्वी काही क्षण आधी विनय नरवाल आणि हिमांशी हे दोघेही जण बैसरन व्हॅलीत आनंद लुटत होते. या दोघांनी फिल्मी स्टाईलमध्ये एक व्हिडीओ चित्रीत केला होता. यामध्ये विनय नरवाल बॉलीवूड किंग शाहरुख खान याची सिग्नेचर पोझ देताना दिसत आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा या दोघांचा हा रोमँटिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नेवी ऑफिसर लेफ्टिनेंट विनय नरवाल की मौत से पहले का आखिरी वीडियो😔 pic.twitter.com/MxjH9rdWyz
— Vaishali Poddar (@PoddarVaishali) April 23, 2025
दरम्यान, लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पार्थिवाला बुधवारी दिल्ली विमानतळावर भारतीय नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी हिमांशी नरवाल यांनीही आपल्या पतीला रडत मानवंदना दिली होती. यानंतर विनय नरवाल यांच्या पार्थिवाला त्यांची बहीण आणि वडिलांनी मुखाग्नी दिला. त्यावेळीही स्मशानभूमीत भावूक वातावरण पाहायला मिळाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी सुन्न होऊन बसलेल्या हिमांशी नरवाल यांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
विनय नरवाल हे लग्न झाल्यानंतर फिरण्यासाठी युरोपला जाणार होते. पण, शेवटच्या क्षणी व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे ते जम्मू आणि काश्मीरला गेले. 21 एप्रिल रोजी दोघेही जम्मू आणि काश्मीरला रवाना झाले. 22 एप्रिल रोजी ते पहलगाममधील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जेवण केल्यानंतर, ते फिरण्यासाठी गेले. त्यावेळी बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना गोळ्या झाडून ठार केले होते. लेफ्टनंट विनय यांचा वाढदिवस 8 दिवसांनी 1 मे रोजी होता. लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसासाठी कुटुंबाने पार्टी आयोजित केली होती. 2 मे रोजी त्यांना पत्नीसह ड्युटीसाठी कोचीला परतावे लागणार होते.
लेफ्टिनेंट विनय नरवाल को बहन और पिता ने दी मुखाग्नि….
#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/WPfAgAtAyh
— Amandeep Pillania (@APillania) April 23, 2025
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

