
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
श्रीनगर: जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर १२ पर्यटक आणि २ स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी तातडीने संपूर्ण परिसर घेरून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम भागात ही घटना घडली आहे.
सुरक्षा दलांनी सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले आहे. संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून, चोहोबाजूंनी नाकेबंदी करण्यात आली आहे. जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा समावेश आहे. माणिक पाटील आणि एस भालचंद्र अशी दोघांची नाव समोर आली आहेत. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या गणवेशात आले होते. तसेच त्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
पुण्यातील पाच जणांचं कुटुंब पेहेलगामला पर्यटनासाठी गेले होते. त्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालून फोटो काढत असताना अचानक दहशतवादी समोर आले. दहशतवाद्यांनी त्यांना नावे विचारली. नावांवरुन त्यांचा धर्म लक्षात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्यं करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे. तर दुसरा पुरुष देखील जखमी आहे.
या कुटुंबासह पुण्यातील आणखी काही पर्यटक देखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत अशी माहिती आहे. तसेच नवीन लग्न झालेल्या एका जोडप्यातील पुरुषालाही दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
#BREAKING : According to a female eyewitness, the attackers reportedly asked the tourists about their religion and opened fire after learning one was a Hindu.#Pahalgam #KashmirAttack #TerrorAlert #TouristAttack #SouthKashmir #PahalgamAttack #Terrorism pic.twitter.com/NVf95HvD5D
— upuknews (@upuknews1) April 22, 2025
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

