Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

चंदीगड (हरियाणा) : जम्मू-काश्मीर येथील पहलगाममधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 27 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात आयबी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला आहे. नेव्हीतील (Navy) लेफ्टनंट विनय नरवाल यांचा वीरगती प्राप्त झाली असून, त्यांना नौदलाकडून आज (बुधवार) मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, त्यांच्या पत्नीने जय हिंद म्हणत श्रद्धांजली वाहिली.

भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, विनय यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. आय एम प्राऊड ऑफ यू विनय इव्हरीटाईम जय हिंद… असे म्हणत विनयच्या पत्नीने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली. आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर अवघ्या सात दिवसांपूर्वी विवाह झालेल्या विधवेनं टाहो फोडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते.

हरियाणातील करनाल जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेले लेफ्टनंट विनय नरवाला यांचे सात दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी लग्न झाले होते. विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनसाठी फिरायला गेले होते. काश्मीरमधील पहलागाम येथे हे नवदाम्पत्य भेळपुरी खात असताना अतिरेक्यांनी विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या. त्यामध्ये, वियन यांचा जागीच मृत्यू झाला, तर आपल्या मृत पतीच्या पार्थिवाजवळ बसून नवविवाहिता हिमांशी टाफो फोडत होती. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या घातल्याचं हिमांशीने म्हटले होते. हिमांशीचा व्हिडिओ आणि तिचा पतीच्या पार्थिवाजवळ बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, देशभरात संतापाची लाट उसळळी आहे. हाती लग्नातला चुडा भरलेला, 7 दिवसांपूर्वीचा आनंद दु:खाच्या शोकसागरात बुडाला आणि खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसल्याचे दिसून आले.

विनयच्या आजोबांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, विनय हे पत्नीसोबत स्वित्झर्लंडला जाणार होते. पण, तिथला व्हिजा न मिळाल्याने काश्मीरला फिरायला गेले होते.

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!