नाशिकमध्ये पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई…

नाशिकः विक्रीस बंदी असलेला गुटखा / तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणा-या पानटपरी चालकांवर विशेष मोहिम राबवून कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही नियमीत तपासणी करून कडक कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी आदेशीत केले आहे.

नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, यांनी अंमलीपदार्थाची तसेच शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणा-या पानटपरी चालकांवर कारवाई करणेबाबत सर्व पोलिस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी यांना विशेष मोहिम राबवुन कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने २७/०२/२०२४ रोजी सायंकाळी १६.०० ते १८.०० या दरम्यान मा. पोलिस उप आयुक्त, गुन्हे व पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – १ व २ यांचे मार्गदर्शनानुसार सर्व पोलिस ठाणे हददीतील अवैध गुटखा तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे पानटपरी चालकांवर एकाचवेळी कारवाई करणेसाठी पोलिस ठाणे कडील ३९ अधिकारी व गुन्हेशाखा व इतर शाखाकडील २० अधिकारी तसेच पोलिस ठाणेकडील ५८२ अंमलदार व गुन्हेशाखा व इतर शाखांकडील ६७ अंमलदार असे एकुण ५९ पोलिस अधिकारी व ६४९ पोलिस अंमलदार कारवाई करणेसाठी नेमण्यात आले होते.

पानटपरी चालकांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकांनी शाळा/महाविदयालय, बसस्टॅंड व इतर सार्वजनिक ठिकाणी विशेष मोहिमे दरम्यान पोलिस ठाणे निहाय कारवाई करण्यात आली. एकूण दंड ३६८००/- रूपये व १६४ केसेस करण्यात आले. यापुढे अंमलीपदार्थाची विक्री तसेच शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणारे पानटपरी चालक यांना नियमीत तपासणी करून कडक कारवाई करणेबाबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी आदेशीत केले आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिक पोलिसांनी बहेनवाल गँगच्या म्होरक्यासह तीन आरोपींना दिल्लीमधून केली अटक…

पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव…

नाशिकमध्ये खून करून फरार झालेल्या दोघांना युनिट १ने ठोकल्या बेड्या…

नाशिक शहरात घरफोड्या करणाऱ्याला भद्रकाली पोलिसांनी घेतले ताब्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!