भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताकडून तयारी सुरू असताना भारत पाकिस्तान सीमेवर एक जवान अचानक सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेला आहे. या जवानाना पाकच्या सैन्याने ताब्यात घेतले आहे. फिरोजपूर स्थित सीमारेषेवरील ही घटना घडली आहे.

भारत-पाकिस्तान बॉर्डरवरील फिरोजपूर स्थित झिरो लाईन पार करुन बीएसएफचा एक जवान पाकिस्तानच्या हद्दीत गेला आहे. या भारतीय जवानास पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतले आहे. हा जवान सीमारेषेवरील कुंपणाच्या हद्दीत नो मॅन्स लँडवरील पीकांची काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या निगराणीचे काम करत होता. मात्र, चुकीने तो पाकिस्तानी सीमा हद्दीत गेल्याने आता वेगळाच प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या जवानाला सोडवून आणण्यासाठी फ्लॅट बैठका घेण्यात येत आहेत.

झिरो लाईनच्या अगोदर या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विशेष परवानगी देऊन शेती करण्यास मुभा दिली जाते. त्यामुळे, पीकांची पेरणी करताना आणि काढणी करताना बीएसएफ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी व निगराणीसाठी तैनात असतात. या शेतकऱ्यांना विशेष किसान कार्डही दिले जाते. या झिरो लाईनवर फक्त खांब बसविण्यात आले असून कुंपण रेषा त्याअगोदरच आहे. पाकिस्तानने आपल्या हद्दीत कुंपणरेषा लावली नाही. त्यामुळे झिरो लाईन पार करुन बीएसएफ जवान उन्हापासून दिलासा मिळविण्यासाठी एका झाडाखाली बसण्यास गेला होता. मात्र, ती जागा पाकिस्तानच्या हद्दीत होती. तेवढ्यात पाकिस्तानी रेंजर्स जल्लोके बीएसएफ चेक पोस्टवर पोहोचले. त्यानंतर, त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफ जवानाला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडील शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत.

या घटनेनंतर बीएसएफचे अधिकारी बॉर्डरवर पोहोचले असून जवानाची सुटका करण्यासाठी बीएसएफच्या अधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत फ्लॅट मिटींग सुरू होती. श्रीनगरची बीएसएफ बटालियन-24 ममदोट येथे शिफ्ट करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी शेतकरी कंबाइन घेऊन फेंसिंगवरील गेट नंबर-208/1 च्या रस्त्याने शेतातील गहू काढणीसाठी शेतकरी गेले होते. येथील शेतकऱ्यांच्या निगरानीसाठी दोन बीएसएफ जवान तैनात होते. याच दरम्यान, जवानाने चुकीने सीमारेषा पार केली. बीएसएफकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आली असून त्यांच्यात फ्लॅट मिटींग सुरू आहेत.

दरम्यान, यापूर्वी जवान चंदू चव्हाण याला पाकिस्तानने पकडले होते. तब्बल तीन महिने २१ दिवसानंतर सुटका झाली होती.

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

soldier-chandu-chavansoldier-chandu-chavan

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!