
Video: ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला घडवली अद्दल…
पुणे: एका ‘पीएमपीएल’ बस चालकाने बेशिस्त कार चालकाला चांगलीच अद्दल घडवली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक बसचालक बीआरटी मार्गात शिरणाऱ्या कारचालकाला चांगला धडा शिकवला आहे. बेशिस्त वाहनचालकाला धडा शिकवण्याचा प्रयत्न या पीएमपीएल बसचालकाने केला आहे.
पुणे शहरात अनेक ठिकाणी पीएमपीएल बससाठी स्वतंत्र बीआरटी मार्ग तयार करण्यात आला आहे, जेथून फक्त पीएमपीएमल बसला जाण्यास परवानगी आहे. असे असतानाही अनेक दुचाकीस्वार आणि कार चालक थेट बीआरटी मार्गाचा वापर करताना दिसतात. पुणे-नगर महामार्गावरील बीआरटी मार्गातून प्रवास करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांना एका पीएमपीएमल बस चालकाने चांगलाच धडा शिकवला आहे. एक बेशिस्त कारचालक आणि रिक्षाचालक बीआरटी मार्गातून प्रवास करत आहे. बेशिस्त वाहनचालक थेट विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये शिरला. पण समोरून येणार्या पीएमपीएल बसचालकाने त्याचा मार्ग अडवला. एवढंच नाही तर कारचालकाला तशीच कार मागे घ्यावी लागली तर रिक्षाचालक रिक्षा वळवून दुसर्या लेनमध्ये जातो.
PMPML चालक कडून सरळ रस्ता दाखवण्याचा प्रयत्न 😂🚍🚌 pic.twitter.com/kQk4moEKCB
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) September 5, 2024
संबंधित व्हिडिओ एक्सवर @PuneriSpeaks नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘PMPML चालक कडून सरळ रस्ता दाखवण्याचा प्रयत्न’, दरम्यान, व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
राज्य पोलिस दलातील 25 पोलिस अधिकार्यांच्या बदल्या; पाहा यादी…
प्रेयसीच्या चिमुकल्याने उलटी केल्याने खून; बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा केला उघड…
Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
मुलीच्या नावे चॅटिंग! युवकावर कोयत्याने हल्ला करणारे दोन तासात जेरबंद…

