Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात बिहारचे मनीष रंजन मृत्यूमुखी पडले. गेल्या दोन वर्षांपासून ते आयबीच्या हैदराबाद कार्यालयात सेक्शन ऑफिसर म्हणून तैनात होते. मनीष यांना त्यांची पत्नी आणि दोन मुलांसमोर गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यांची पत्नी आशा देवी आणि दोन्ही मुले सुरक्षित आहेत.

मनीष हे रोहतासच्या कारगहर पोलीस स्टेशन परिसरातील अरुही गावचा रहिवासी होते. गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर मनीष यांनी त्यांची पत्नी आणि मुलांना दुसऱ्या दिशेने पळण्यास सांगितले. या काळात ते त्यांच्या कुटुंबापासून वेगळे झाले. दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. मनीष यांचे लग्न 2010 मध्ये झाले. त्यांना 12 वर्षांचा मोठा मुलगा आणि 8 वर्षांची मुलगी आहे. मनीष ३ दिवसांपूर्वी हैदराबादहून वैष्णोदेवीला गेले होते. मनीष रंजन हे आधी रांची येथे तैनात होते, नंतर त्यांची हैदराबाद येथे बदली झाली होती.

दरम्यान, दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातून आलेल्या शुभम द्विवेदीला नाव विचारले आणि नंतर त्याच्या डोक्यात गोळी झाडली. शुभमचे लग्न फक्त दोन महिन्यांपूर्वी झाले होते. तो त्याच्या हनीमूनसाठी गेला होता.

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून गोळीबार; चकमकीत 4 जवान हुतात्मा…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला; 10 जणांचा मृत्यू…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!