Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी (ता. ७) मध्यरात्री भारताच्या सशस्त्र दलांनी Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) सुरू केले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिसाईल डागून हल्ला करण्यात आला आहे. या दहशतवादी तळांवरूनच पहलगाममध्ये हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते.

भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या 9 ठिकाणांना लक्ष्य केले. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे. पाकिस्तानने सुद्धा हल्ला झाल्याची माहिती दिली आहे.

भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे मुख्यालये, तळ उद्धवस्त झाले असून, अनेक दहशतवाद्यांचा झोपेत असतानाच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. भारतामधील नागरिकांनी सरकार आणि लष्कराचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, भारतीय सैन्याने बुधवारी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक आणि मर्यादित हल्ले केले. ही कारवाई पूर्णपणे गैर-प्रक्षोभक होती आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला लक्ष्य केले गेले नाही. हल्ले त्या ठिकाणी झाले जिथून भारतावर दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात होती. सैन्याच्या एक्स (X) हँडलनुसार, हे ऑपरेशन केवळ 23 मिनिटांत पार पडले. पहाटे 1:28 ते 1:51 दरम्यान पाकिस्तानात अनेक ठिकाणी स्फोट झाले. अखेर सैन्याने 1:51 वाजता पुष्टी केली की पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील ‘न्याय झाला.’

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)


Operation Sindoor Time Line :
1:28 AM: इंडियन आर्मीच्या अधिकृत हँडल ADGPI ने ट्विट केले: प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः। (प्रहारासाठी तत्पर, विजयासाठी प्रशिक्षित.) हे ऑपरेशनच्या सुरुवातीचे संकेत होते.
1:28 AM ते 1:51 AM दरम्यान: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्फोट झाले. विशेषतः मुजफ्फराबादसारख्या भागातील स्थानिक लोकांनी ग्रीड स्टेशन्सवर क्षेपणास्त्र हल्ल्यांविषयी सांगितले. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात गोंधळाचे वातावरण होते.
1:51 AM: सैन्याने दुसरे ट्विट केले: #PahalgamTerrorAttack Justice is Served. Jai Hind

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, भारत माता की जय! केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही हेच ट्विट केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, जय हिंद, जय हिंद की सेना! आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले, जय हिंद! ऑपरेशन सिंदूरचा उद्देश स्पष्ट आहे – दहशतवादी ठिकाणे नष्ट करणे आणि भारतावर हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही हा संदेश देणे. ही संपूर्ण कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली आहे. ज्यामध्ये 25 भारतीय आणि एका नेपाळी नागरिकांचा बळी गेला होता. भारताने स्पष्ट केले होते की नक्कीच प्रत्युत्तर मिळेल आणि आज ते घडले.

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

भारताचे संरक्षण संस्थाने पूर्णपणे हाय अलर्टवर असल्याची बातमी आहे. सर्व एअर डिफेन्स युनिट्स सक्रिय करण्यात आल्या. याच दरम्यान एनएसए अजित डोवाल यांनी अमेरिकेचे एनएसए आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांना या कारवाईची माहिती दिली. वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाने याची पुष्टी केली. आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘आम्हाला नुकतीच याबद्दल माहिती मिळाली आहे, लवकरच ही लढाई संपेल अशी आशा आहे.’ त्याच वेळी अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. परंतु या क्षणी कोणतीही टिप्पणी करू शकत नाही.

मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…

भारत हल्ल्याचा नुसताच इशारा देतो; पण अद्याप काही झालेले नाही…

Video: पाकिस्तानची उडाली झोप! मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद…

काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…

पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…

भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!