
सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, पोलिसांची मोठी कारवाई…
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्या प्रकरणी जयदीप आपटे आणि डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राज्य सरकारच्या दाव्यानुसार, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याची देखरेख आणि निगा करण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. तर केतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या 35 पुतळी फुट्याचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या आठ महिन्यांत हा पुतळा कोसळल्याने त्याची बांधणी निकृष्ट असल्याचा आरोप होत आहे. या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी गंज लागला होता. ही बाब लक्षात येताच सार्वजनिक बांधकाम खात्याने पत्र लिहून ही गोष्ट नौदलाला कळवली होती. मात्र, त्यानंतर नौदलाकडून योग्य ती कार्यवाही झाली नाही आणि शिवाजी महाराजांचा हा पुतळा मुळापासून कोसळण्याचा दुर्दैवी प्रकार घडला. यावरुन विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची राळ उठवली आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल झालेले स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटले होते की, विरोधकांना टीका करायला वेळच वेळ आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही. झालेली घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचे डिझाईन केले होते. याप्रकरणी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितले की, ताशी 45 किलोमीटर वेगाने वारा वाहत होता, त्यामुळे हे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…
पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; ग्रामस्थांनी सांगितले…
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…
मोठं मन! बिहारमध्ये कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारा अधिकारी महाराष्ट्राचा…

