
काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी निघाला पाकिस्तानमधील…
नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पाच ते सहा दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला आहे. देशभरात यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचे माजी पॅरा कमांडो असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. यामुळे या हल्ल्यामागे थेट पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप होत आहे. तपास संस्थांच्या सूत्रांनुसार, पहलगाम हल्ल्याच्या मागे दहशतवादी हाशिम मूसा असल्याचे संकेत मिळत आहेत. हाशिम मूसा हा पाकिस्तानचा नागरिक असून तो स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो आहे.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या हाशिम मूसाचे थेट संबंध पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत. मूसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा (SSG) माजी पॅरा कमांडो आहे. पॅरा कमांडो म्हणून काही काळ काम केल्यानंतर तो लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसोबत काम करू लागला आहे.
काश्मीरच्या पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी त्याला पाठवले होते. जम्मू-काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांवर, पर्यटकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचे आदेश त्याला देण्यात आले होते. दरम्यान, या खुलाशामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आणि किट पुरवणाऱ्या टीमचा देखील हाशिम मूसा भाग आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी युद्धाच्या भितीने तलवार म्यान करण्यास केली सुरूवात…
भारतीय जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! परत करण्यास नकार…
भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…
पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…
Video: भारतीय विद्यार्थ्यांकडे पाहून पाकिस्तानी अधिकाऱ्याने दिला गळे कापण्याचा इशारा…
विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…
Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…
Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…
Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…
Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…
Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…
Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…
Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

