पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

कराची (पाकिस्तान): भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने पकडले होते. त्यावेळी त्यांना दिलेल्या चहाचं बिल सोशल मीडियावर जाहीर केले आहे. बिल पाहून नेटिझन्सने टीकेची झोड उठवली आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजच्या (PMLA) अधिकृत ट्विटर हँडलवर हे बिल शेअर करण्यात आले आहे. नेते आणि सैन्याच्या नापाक हरकतींमुळे सोशल मीडियावर नेहमीच मस्करीचा विषय असलेल्या पाकिस्तानाने पुन्हा एकदा खालची पातळी गाठली आहे. पाकिस्तानने ट्विटर हँडलवर एक बिल शेअर केले आहे. P.A.F OFFICER’S MESS चं हे बिल आहे. यावर अभिनंदन यांचे नाव लिहिण्यात आले असून, त्यात चहा दिल्याचा उल्लेख आहे. या बिलाच्या माध्यमातून पाकिस्तानने भारताची खिल्ली उडवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण, नेटिझन्सनी टीका केल्यानंतर त्यांच्याच अंगलट आले आहे.

दरम्यान, 2019 मध्ये MIG-21 चालवणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत क्रॅश झाले होते. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने अभिनंदन यांना ताब्यात घेतले होते.पाकिस्तानी सैन्याने त्यांना चहा दिला होता, याचा व्हिडिओ त्यांनी चित्रित केला. यावेळचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. भारताच्या दबावानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केली. पण त्या फोटोंचा आणि व्हिडिओचा वापर पाकिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या पीएमएल पक्षाकडून भारताची खिल्ली उडवण्यासाठी केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!