
गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…
पुणे : गुंड निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असून, त्याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आता समोर आली आहे. पुण्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने निलेश घायवळ याने अहिल्यानगरमधील बनावट पत्ता देऊन पासपोर्ट मिळवल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याची पार्श्वभूमी न तपासता अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोथरुडमध्ये 17 सप्टेंबर रोजी दोन निरपराध नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. एकावर बंदुकीने तर दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला होता. निलेश घायवळच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचे तपासादरम्यान समोर आले. त्यानंतर घायवळ आणि त्याच्या इतर सहा साथिदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. मात्र या दरम्यान, निलेश घायवळ लंडनला पसार झाल्याचे उघड झाले आहे. लंडनला पसार झालेल्या गुंड निलेश घायवळने पासपोर्ट मिळवण्यासाठी अहिल्यानगरमधील पत्ता दिल्याचे समोर आले आहे.
नगरमधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली, माळीवाडा रोड हा पत्ता घायवळ याने पासपोर्ट मिळवण्यासाठी वापरल्याचे उघड झाले. त्यामुळे नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निलेश घायवळचा गुन्हेगारी इतिहास न तपासताच पासपोर्टसाठी संमती कशी दिली? हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे नगर पोलीस आता वादात सापडू शकतात.
दरम्यान, निलेश घायवळ याने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही, असे पुणे पोलिसांनी म्हटले होते. त्याच्याबाबत लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यामधुन खूप मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातून त्याने लंडनमध्ये घर घेतल्याची माहिती आहे. तसेच त्याचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…
पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…
Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…

