पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार; भारताकडून चोख प्रत्युत्तर…

श्रीनगर (जम्मू-काश्मीर): पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एलओसीवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला असून, भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) अनेक पाकिस्तानी चौक्यांवर रात्रीच्या सुमारास गोळीबार सुरू होता. जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर दिले. सकाळपर्यंत दोन्ही बाजूने गोळीबार सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी लवकरच श्रीनगर आणि उधमपूरला रवाना होतील. ते काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या वरिष्ठ लष्करी कमांडर आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. जनरल उपेंद्र द्विवेदी खोऱ्यातील सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या प्रयत्नांचा आढावा घेणार आहेत.

भारत-पाक बॉर्डर! भारतीय जवानाला पाकिस्तान रेंजर्सने घेतले ताब्यात…

विनय नरवाल अन् हिमांशीचा बैसरन व्हॅलीतील शेवटचा Video…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! आठवडाभरापूर्वीच विवाह झालेले लेफ्टनंट यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू…

Pahalgam Terror Attack! चुडा भरलेली नवविवाहिता सुन्न; दहशतवाद्यांना म्हणाली…

Video: कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांनी अंगावर काटा आणणारी सांगितली घटना…

Pahalgam terror attack! IB अधिकाऱ्याला पत्नी आणि मुलांसमोर दहशतवाद्यांनी घातली गोळी…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्याचा पहिला फोटो समोर, हातामध्ये अत्याधूनिक शस्त्र…

Pahalgam Terror Attack! दहशतवाद्यांनी पँट काढायला सांगितली अन् झाडल्या गोळ्या; पाहा मृतांची नावे…

Pahalgam Attack Video! काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारून थेट गोळ्या झाडल्या…

soldier-chandu-chavansoldier-chandu-chavan

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!