Video: गणेश काळे याचा पाठलाग केला अन् चार गोळ्या झाडल्या…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा परिसरातील गणेश काळे या रिक्षा चालकाच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. आंदेकर-कोमकर टोळीयुद्धातून गणेश काळे याची हत्या झाल्याची माहिती आहे. हत्या केल्यानंतर चारही आरोपी पळून गेले होते. या चारपैकी एक आरोपी हा कृष्णा आंदेकरचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे.

गणेश काळे हा कोमकर गँगचा सदस्य असलेल्या समीर काळे याचा भाऊ आहे. समीर काळे हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. त्यामुळेच गणेश काळेची हत्या करण्यात आली का? याचा तपास आता पुणे पोलिस करत आहेत. अटक करण्यात आलेल्या या चार आरोपींपैकी एक आरोपी हा रील स्टार आहे. तर या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गणेश काळे याची हत्या करुन पळून जाताना मारेकरी दिसत आहेत. पोलिसांनी पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश काळे हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होता. दुपारी तीनच्या सुमारास येवलेवाडीतून खडीमशीन चौकाकडे येत होता. खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोगदेव घाटातील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोलपंपा समोरच शनिवारी (ता. १) दुपारी त्याची हत्या करण्यात आली. गणेश काळे असे हत्या करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. गणेश काळे हा वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे. वनराज आंदेकर याच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप समीर काळे याच्यावर आहे.

पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी याप्रकरणी सांगितले की, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणेश काळे हा रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी दोन दुचाकीवरून काही जण त्याचा पाठलाग करत आले. चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. चार राऊंड फायर करण्यात आले. गणेश काळे जखमी झाल्यानंतर त्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने दोन वार करण्यात आले. यात कोयत्याच्या हल्ल्याने त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. गणेश हा येवलेवाडीत राहत होता.

दरम्यान, आरोपींनी पेट्रोलपंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याला काहीच करता आले नाही. त्याला सावरण्याची संधी मिळण्यापूर्वीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरु केला. गणेश काळेला चार गोळ्या लागल्या. मानेत, छातीत व पोटात गोळ्या घुसल्या. त्यावंतर तो तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. तो खाली कोसळल्यानंतर दोन हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ही हत्या गँगवारमधून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली होती, तो पॅटर्न गणेश काळेच्या हत्येसाठी वापरण्यात आला आहे. वनराज आंदेकरवर आधी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यानंतर कोयत्याने वार करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात पुण्यातील नाना पेठमध्ये वनराजच्या भाच्याची आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली होती, असे म्हटले जाते. आता गणेश काळेच्या हत्येने आंदेकर आणि कोमकर टोळी युद्धाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

आंदेकर X कोमकर सूडनाट्य! कोंढवा परिसरात एकावर गोळीबार अन् हत्या…

पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी गोठवली २७ बँक खाती ; बॅंकेत रक्कम किती पाहा…

पुणे पोलिसांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी उचललं मोठं पाऊल…

आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, मामी ताब्यात…

आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…

पुणे पोलिसांचा बंडू आंदेकरला मोठा दणका, पाहा महिन्याची कमाई…

आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! बंडू आंदेकर नातवाच्या हत्येवर पहिल्यांदाच बोलला…

पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!