
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) गोळीबार आणि नंतर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला होता. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर आले आहे. पूर्ववैमानस्य आणि बदला घेण्यासाठीच आंदेकर यांची हत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आंदेकर यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा पोलिसांना संशय आहे. गायकवाडने त्याचा साथीदार निखिल आखाडे याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच हा खून केल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा देखील संशय आहे.
दरम्यान, सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर ऑक्टोबर २०२३ मध्ये कोयता आणि स्कू-ड्रावरने वार करण्यात आले होते. यामध्ये निखिल आखाडे याचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सोमनाथने संजीवनी, जयंत, प्रकाश आणि गणेश कोमकर यांच्याशी संगनमत करून वनराज यांच्या खुनाचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

