
आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…
पुणे: पुणे पोलिसांनी सोमवारी (ता. ८) मध्यरात्री आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण सहा जणांना अटक केली आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुणे शहरातील नाना पेठेत आंदेकर टोळीने नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला. आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या केली. आंदेकर टोळीच्या अमन पठाण आणि यश पाटील यांनी तब्बल १२ गोळ्या झाडल्या. यातील ९ नऊ गोळ्या आयुषच्या शरीरात आढळल्या आहेत. हल्लेखोरांनी बेसमेंटमध्ये दबा धरून आयुषची हत्या केली. या हत्येनंतर आयुषची आई कल्याणी कोमकर हिने आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. पण हा गुन्हा दाखल व्हायच्या आधीच आंदेकर कुटुंब फरार झाले होते. आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होते. पण, सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. यापूर्वी यश पाटील आणि अमित पोटोळे या दोघांना अटक केली होती. आता अटकेतील आरोपींचा आकडा आठवर पोहोचला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्राबाहेरून बंडू आंदेकर याच्यासह स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर त्यांची आई आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पण या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०) याच्यासह कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) अशा १३ जणांचा समावेश आहे.
आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…
आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…
आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…
आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

