
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात रविवारी (ता. १) रात्री पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून, या घटनेने हादरले आहे. या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांच्यावर 5 राऊंड फायर करण्यात आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी 2 संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
कौटुंबिक वाद आणि पैसा यातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. वनराज यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नाना पेठेतल्या डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर थांबले होते, तेव्हा दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने बंदुकीतून पाच राऊंड फायर केले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर वनराज आंदेकर यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलिस घेत आहेत. याआधी पुण्यात शरद मोहोळ याचीही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा पुणे गोळीबाराच्या घटनेनं हादरले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हा गोळीबार झाल्यामुळे नाना पेठ परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे.
वनराज आंदेकर यांचा सख्खा दाजी कोमकर याने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गोळीबाराची घटना घडल्यानंतर घटनास्थळी समर्थ पोलिस स्टेशनचे पोलिस आणि गुन्हे शाखेचे पोलिसही दाखल झाले होते. हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा शोध पोलिस घेत आहेत. याआधी पुण्यात शरद मोहोळ याचीही हत्या करण्यात आली होती.
दरम्यान, वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये जयंत कोमकर आणि गणेश कोमकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे सध्या समोर आली आहे. वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, ‘रविवारी (ता. १) संध्याकाळी साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे, हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, या आरोपींचा शोध घेण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आलेले आहेत.
कोण आहे वनराज आंदेकर?
वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या 2007 आणि 2012 या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते.
पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

