बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था…

बीड: गेवराई तालुक्यातील कोपरा गावातील एका युवकाने धमक्या व खोट्या तक्रारीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामेश्वर महादेव डरपे असे मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

‘बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था. किसीके लिए’ असे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत रामेश्वर डरपे यानेआत्महत्या केली. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामेश्वरने लिहिलेली एक चिठ्ठी त्याच्या खिशात मिळून आली. या प्रकरणी संजय डरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब उर्फ बालाजी अर्जुन ढगे (रा. टाकळगाव, ता. गेवराई), संदीपान देवीदास धोत्रे (रा. आंतरवली, ता. गेवराई), तानाजी सुरेश घोलप, सरस्वती सुरेश घोलप, सुरेश आसाराम घोलप (सर्व रा. तलवाडा), रामनाथ दाभाडे (रा. गेवराई) व अन्य एक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…

युवकाची विवाहापूर्वी गोळ्या झाडून हत्या; हल्लेखोराने ठेवले स्टेटस…

व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी…

ज्येष्ठ साहित्यिक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलंडताना अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!