मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आला धमकीचा फोन…

मुंबईः मुंबई पोलिसांना मंगळवारी (ता. २१) रात्री पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून, मुंबईत मोठा घातपात होणार असल्याची फोनवरुन माहिती दिली आहे. दक्षिण मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे.

एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, ‘मुंबईत मोठा कांड होणार आहे’. मुंबई पोलिसांना यापूर्वीही असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीसांना दिल्या

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला मंगळवारी रात्री हा धमकीचा कॉल आला. फोनवरील व्यक्तीने मुंबईत मोठा घातपात होणार असल्याचा दावा केला. कॉल कंट्रोलमध्ये उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आसिफ नावाच्या काश्मिरी व्यक्तीशी संपर्क असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरचा दावा आहे. एटीएसचे अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचा शोएब नावाच्या कॉलरने दावा केला आहे. समा आणि आसिफचे फोन नंबर देखील पोलिसांच्या हवाली केले आहे. मुंबई पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांना यापूर्वीही अनेकदा धमकीचे फोन आले आहेत. अनेकदा असे फेक कॉल येत असतात. आतापर्यंत आलेल्या धमकीच्या फोनपैकी 90 टक्के हे फेक कॉल होते. जुलै महिन्यातही मुंबई पोलिसांना असे धमकीचे फोन आले होते, यावेळी 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेबाबत सतर्क राहण्याची सूचना संबंधित पोलीसांना दिल्या. यानंतर अवघ्या काही तासांत या आरोपीला अटक करण्यात आली होती.

मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…

मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…

मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती; गृह खात्याचा निर्णय…

मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी…

छगन भुजबळ यांना पुन्हा धमकीचा फोन; निट रहा नाहीतर…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!