दाऊद टोळीच्या फरार गँगस्टरला मुंबई पोलिसांनी 29 वर्षानंतर ठोकल्या बेड्या…
मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा 29 वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर प्रकाश रतीलाल हिंगू (वय 63) याला हुबळी (कर्नाटक) येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई करत पोलिसांनी हिंगू याला बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात डॉन दाऊद […]
अधिक वाचा...शरद मोहोळ याच्या हत्येचा घेणार होते बदला; पुणे पोलिसांनी मोठा कट उधळला…
पुणे (संदिप कद्रे): कुख्यात गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येचा एका वर्षाच्या आत बदला घेण्याचा इरादा असलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मोहोळ हत्येचा बदला घेण्यासाठी दोन जण मध्य प्रदेशातून पिस्तुल घेऊन आले होते. मोहोळ टोळीच्या या दोघांनाही अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शरद मालपोटे आणि संदेश कडू असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे […]
अधिक वाचा...सोशल मीडियाच्या धोक्याला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची धडपड
पुणे : गुन्हेगारी आणि हिंसाचाराबद्दल टॉम-टॉमिंग, इंस्टाग्राम शॉर्ट्सने पोलिसांसमोर एक आव्हान उभे केले आहे, जे या प्रभावशालींवर कारवाई करत आहेत, तरुणांकडून सोशल मीडियावर बॉलीवूड शैलीतील गुन्हेगारी आणि हिंसाचाराचे गौरव करणाऱ्या रील्स पोस्ट करण्याच्या वाढत्या ट्रेंडमुळे पुणे पोलिसांची धावपळ उडाली आहे. त्यांना कळी मध्ये nip करण्यासाठी. इन्स्टाग्रामवर या रील्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावावर लक्ष ठेवणे हे कायद्याची अंमलबजावणी […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: कोयत्याने सपासप वार अन् कारने चिरडलं…
बंगळूरू (कर्नाटक): एका टोळक्याने एकमेकांवर तलवारीने वार केले. एवढंच नाहीतर एकाला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात ही घटना घडली आहे. गँगवॉरचा हा व्हिडीओ 18 मे रोजीचा आहे. गँगवॉरमधून कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन वाहनांमधून आलेल्या […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात आणखी एका गँगस्टरची टोळक्याकडून हत्या; पत्नीही जखमी…
मुंबई : नवी मुंबईमधील कुख्यात गुंड चिराग लोके याची लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे. चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरुळ पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चिराग लोके याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरुपाचे […]
अधिक वाचा...शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘वाघ्या’ला अटक…
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ हत्येप्रकरणी मुख्य आरोपी रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह इतर आरोपींना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचण्यात रामदास मारणे उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलारची मुख्य भूमीका आहे. शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत पुणे पोलिसांनी 13 जणांच्या […]
अधिक वाचा...मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह दहा दिवसानंतर आढळला…
चंदीगड (हरियाणा) : मॉडेल दिव्या पाहुजा हिचा मृतदेह दहा दिवसानंतर आढळला आहे. पोलिसांनी एका कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे. मॉडेल दिव्या पाहुजा हिचा 2 जानेवारी रोजी गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने त्यांचे […]
अधिक वाचा...गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…
पुणे : कोथरूड येथे गँगस्टर शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. पण, आरोपींनी सीसीटीव्ही असलेल्या परिसरातच खून केला. यामागे त्यांचा उद्देश दहशत निर्माण करण्याचा होता असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. […]
अधिक वाचा...मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशीच घराजवळ हत्या करण्यात आली. शरद मोहोळ सोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याबाबतचा तपास सुरू आहे. शरद मोहळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे. मोहळच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेले […]
अधिक वाचा...पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरुड परिसरात आज (शुक्रवार) गोळीबार करण्यात आला होता. एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु,उपचारादरम्यान शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोथरूड येथे […]
अधिक वाचा...