वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची नाना पेठेत रविवारी (ता. १) रात्री साडे आठच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड त्यांच्या सख्ख्या बहिणीचा पतीच असल्याचे समोर आले आहे. आंदेकर यांच्याशी जुना वाद असलेल्यांना हाताशी धरून दाजीने ही हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी दोन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे.

वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी सोमनाथ गायकवाडची मदत घेतली. सोमनाथच्या टोळीतील एकाची हत्या वर्षभरापुर्वी झाली होती. त्याचाच बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड टोळीने गणेश कोमकरला सोबत घेऊन हा प्लॅन आखला. वनराज आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्यात पूर्व वैमनस्य होते. वनराज आंदेकरचे कौटुंबिक वाद असल्याचे सोमनाथ गायकवाडला समजले होते. वर्षभरापूर्वी सोमनाथ गायकवाड याच्या टोळीतील आखाडेची हत्या झाली होती. आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सोमनाथ गायकवाड याच्या टोळीने कोमकरांना सोबत घेऊन ही हत्या घडवून आणली. वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. अनिकेत दहीभाते असे हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव आहे.

सख्ख्या बहिणीनेच वनराज आंदेकर यांना पोलीस ठाण्यात थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. वनराज आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामधे आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.’ असं धमकावले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी वनराजची हत्या झाली. वनराज यांचा खून त्यांच्या सख्ख्या दाजीने केला आहे. गणेश कोमकर आणि जयंत कोमकर यांच्यासह दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी अटक केली आहे.

वनराज आंदेकर यांच्या बहिणीचा आणि वनराज यांचा घरगुती वाद होता. आंदेकरनी कोमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिले होते, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडले. त्याच रागातून सख्ख्या दाजीने वनराज आंदेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

वनराज आंदेकरवरील हल्ला cctv मध्ये कैद झाला आहे. पाहा व्हिडिओ…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!