वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेक यांची १ सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणात शस्त्र पुरविणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संगम संपत वाघमारे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणात आतापर्यंत तब्बल 15 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आंदेकर यांच्या तीन बहिणींसोबतच तीन अल्पवयीनांचा समावेश आहे.

वनराज आंदेकर यांच्या हत्ये प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. आरोपींना संगम वाघमारे (वय २०) याने शस्त्र पुरवल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेनं आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सापळा लावून मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले आहे. वाघमारेला अटक करून रविवारी न्यायलायात हजर करण्यात आले. त्याला 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, सहा ते सात टू व्हीलरवरुन तेरा ते चौदा जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार केले होते. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले होते. सध्या हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून, पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!