आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत एक वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्स येथे वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोमकर (वय २०) याची हत्या केली होती. पोलिसांना आंदेकर टोळी कोमकर कुटुंबावर हल्ला करणार, याचा अंदाज होता. पोलिसांनी आंदेकर टोळीचा एक प्रयत्न उधळून लावला होता. मात्र,अखेर 5 सप्टेंबरला आंदेकर टोळीने आयुष कोमकरची हत्या केली. यानंतर पुण्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी आयुष कोमकर याच्यावर अंत्यसंस्कार करुन दिले नव्हते.

आयुष कोमकरची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होते. त्यामुळे संपूर्ण पोलीस दल गणेश विसर्जनाच्या बंदोबस्तात गुंतले होते. अशा परिस्थितीत आयुष कोमकर याच्या अंत्यसंस्कारासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा उपलब्ध करुन देणे शक्य नव्हते. याशिवाय, आयुष कोमकर याचे वडील आणि काही कुटुंबीय हे तुरुंगात आहेत. आयुषच्या हत्येनंतर जयंत कोमकर, संजीवनी कोमकर आणि गणेश कोमकर यांच्याकडून पॅरोलवर तुरुंगातून सोडण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. हे सर्वजण नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांना पुण्यात येण्यासाठी वेळ लागणार होता. या कारणांमुळे पुणे पोलिसांनी आयुष कोमकर याच्यावर लगेच अंत्यसंस्कार करणे टाळले होते.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

पोलिसांनी आयुष कोमकर याचा मृतदेह ससून रुग्णालयातील शवागारात ठेवला होता. हा मृतदेह आज (सोमवार) बाहेर काढला जाणार असून संध्याकाळपर्यंत त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. या अंत्यसंस्कारासाठी आयुष कोमकर याचे वडील आणि वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर याला पॅरोल मंजूर करण्यात आला असून, मुलावर अंत्यसंस्कार करतील. आई संजीवनी कोमकर आणि काका जयंत कोमकर यांना पॅरोल नाकारण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्याप्रकरणात संपूर्ण आंदेकर फॅमिलीवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकरसह 13 जणांचा समावेश आहे. बंडू आंदेकर हे आंदेकर टोळीचे प्रमुख आहेत. गेल्यावर्षी एक सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती, तो बंडू आंदेकरांचा मुलगा होता. आयुष कोमकर हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. 5 सप्टेंबरला आयुष कोमकर क्लासमधून येत असताना घराच्या बेसमेंटजवळ दोघांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने आज आयुष कोमकर याच्या अंत्यसंस्कारावेळी पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!