पुणे! बंडू आंदेकरच्या घरावर पोलिसांची धाड; काय-काय सापडलं पाहा…

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील आंदेकर टोळीचा म्होरक्या असलेल्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याच्या घराची बुधवारी (दि. १०) सायंकाळी पाच ते गुरुवारी (दि. ११) पहाटे चारपर्यंत पुणे पोलिसांनी झडती घेतली. गुन्हे शाखेसह समर्थ पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी त्याच्या घरातून मोठं घबाड सापडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना आंदेकरच्या घरातून रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने, कुलमुखत्यारपत्र, साठेखत अशा गोष्टी सापडल्या आहेत. आंदेकरने घराच्या शंभर मीटर परिसरात २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

बंडू आंदेकर याची मुलगी कल्याणी यांचा मुलगा आयुष कोमकर याच्यावरती ५ सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणात बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीतील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी बुधवारी बंडू आंदेकर, अमन पठाण, यश पाटील, वृंदावनी, स्वराज व तुषार (वाडेकर कुटुंबीय) यांच्या घराची झडती घेतली. या झडतीत वृंदावनी, स्वराज आणि तुषार यांच्या घरातून २१ हजार रोख, १६ मोबाईल, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी जप्त केली आहे. टोळीचा म्होरक्या बंडू यांच्या घरातून ७७० ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची आजच्या बाजार भावानुसार ८५ लाखांहून अधिक किंमत आहे. ३१ हजार रुपयांची चांदी आणि २ लाख ४५ हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली.

बंडू आंदेकरच्या घरात १० पेक्षा अधिक साठेखत, पॉवर ऑफ अॅटर्नी, बँकेचे पासबुक, एक कार, विविध करारनामे, टॅक्स पावत्या, पेनड्राईव्ह इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांकडून तब्बल ११ तास ही मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष कोमकरच्या खुनाचा तपास सुरू आहे. बुधवारी या प्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, वनराज आंदेकर यांचा खुनाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. १ सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी बंडू आंदेकर आणि त्याच्या घरच्यांनी २२ ऑगस्ट रोजी तिथीनुसार त्यांचे वर्षश्राद्ध केले होते. त्यानंतर ते केरळ येथे देवदर्शनासाठी गेल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!