पोलिसांचा धाक! बंडू आंदेकर मुकाट्याने गुडघ्यावर आला; पण कसा पाहा…

पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत झालेल्या गोळीबारात आयुष कोमकर याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. आयुष कोमकर याचे आजोबा बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरुन ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आयुष कोमकर हा बंडू आंदेकरांच्या मुलीचा मोठा मुलगा होता.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

पोलिसांनी बंडू आंदेकरसह सहा जणांना सोमवारी रात्री बुलढाणानजीक समृद्धी महामार्गावर पळून जाताना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दोन मारेकऱ्यांना अगोदरच अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हत्याप्रकरणाचा तपशील सांगितला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यासोबत आठ आरोपींना चेहरे झाकून आणले होते. या आठ आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचाही समावेश होता. त्यांचे फोटो काढण्यासाठी या सर्वांना खाली बसवण्यात आले होते. तेव्हा बंडू आंदेकर सगळ्यांच्या मधोमध मांडी घालून बसला होता. तर इतर आरोपी हे गुडघ्यावर बसले होते. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी बंडू आंदेकर याला गुडघ्यावर बसण्याच्या सूचना दिल्या. यानंतर बंडू आंदेकर उठला आणि निमूटपणे आपल्या काळ्या रंगाच्या चपला हातात घेऊन गुडघ्यावर बसला.

बंडू आंदेकर हा जवळपास 60 वर्षांचा आहे. साहजिकच वयपरत्वे त्याच्या हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे इतरांप्रमाणे त्याला गुडघ्यावर बसण्यात अडचण होती. मात्र, पोलिसांनी आपल्या 19 वर्षांच्या नातवाचा बळी घेणाऱ्या याच बंडू आंदेकरला मुकाट्याने गुडघ्यावर बसण्यास भाग पाडले. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, बंडू आंदेकरला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. यावेळी बंडू आंदेकर याने आयुष कोमकर याच्या हत्याप्रकरणात सहभागी असल्याचा आरोप फेटाळला. त्याने म्हटले की, आयुष कोमकर हा माझा नातू होता. त्याचा खून करून मला काय मिळणार? आयुष माझा वैरी आहे का? कौटुंबिक वादातून आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. माझ्या मुलाची गेल्यावर्षी हत्या झाली. त्या प्रकरणात आपण फिर्यादी आहोत. त्याचा बदला म्हणून माझे नाव याप्रकरणात गोवण्यात आले. आयुषची हत्या झाली त्यादिवशी मी केरळमध्ये होतो, असा दावा बंडू आंदेकरने पोलीस चौकशीत केला होता. माझ्या मुलाच्या हत्याप्रकरणात मी फिर्यादीच्या पतीचे, सासऱ्याचे आणि दीराचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता त्यांनी मला याप्रकरणात गोवले. माझं संपूर्ण कुटुंब जेल मध्ये गेलं पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे. कारण माझ्या मुलाच्या खून प्रकरणी मी कल्याणीच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवले आहे, असे बंडू आंदेकर पोलिसांना म्हणाला.

आंदेकर X कोमकर! पुणे पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात केली मोठी कारवाई…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…

आंदेकर X कोमकर! आयुषच्या लहान भावाने पाहिली हत्या सांगितला थरार…

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…

आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!