फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

पुणे: फर्ग्युसन महाविद्यालयात बी. एस्सी.च्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (ता. 27) रात्री ही घटना घडली असून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ओम कापडणे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात ओमने गुरुवारी रात्री गळफास घेतला. याबाबतची माहिती मिळताच हेल्परायडर्स संघटनेच्या कार्कर्त्यांनी ओम याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

ओम मूळचा नाशिक येथील आहे. तो विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी चिठ्ठी आढळून आलेली नाही. ओमने हे पाऊल का उचलले, याचा तपास सुरू आहे.

पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…

येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…

सराईत गुन्हेगार वैभव इक्करची हवेली पोलिसांनी काढली धिंड…

विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!