पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शहरात गॅंगवाराचा भडका उडाला असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला टोळीने खून करूनच घेतला आहे. आंदेकर खुनातील आरोपीच्या मुलावर टोळीने पिस्तुलातून ११ गोळ्या झाडल्या. त्यातील ३ गोळ्या लागून युवकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह अकरा जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर (वय १८, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ, पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील, (सर्व रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत आयुष कोमकर याची आई कल्याणी गणेश कोमकर (वय ३७, रा. लक्ष्मी कॉम्प्लेक्स, हमाल तालमीजवळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

दरम्यान, गेल्या वर्षी एक सप्टेंबर रोजी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, वनराज आंदेकर याची बहीण संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि दीर गणेश कोमकर यांच्यासह १६ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा बदला या खुनाद्वारे घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष हा शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास क्लास सुटल्यानंतर दुचाकीवरून लक्ष्मी कॉम्प्लेक्स सोसायटीत आला. तो तळमजल्यावर दुचाकी लावत होता, त्या वेळी आरोपी अमन खान, यश पाटील हे सोसायटीच्या आवारात दबा धरून बसले होते. आरोपींनी आयुष याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून केला. आयुष याच्या खुनाचा कट बंडुअण्णा आंदेकर, तसेच अन्य आरोपींनी रचला. त्यासाठी गोळीबार करणारे आरोपी खान आणि पाटील यांनी मदत केली, असे आयुष कोमकर याची आई कल्याणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

कौटुंबिक वाद, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून १ सप्टेंबर २०२४ रोजी टोळीने नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, कोयत्याने वार करुन वनराज आंदेकर याचा खून केला होता. आंदेकरची बहीण संजीवनी, तिचा पती जयंत, दीर गणेश, प्रकाश यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून खून झाल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषआरोपात नमूद केले होते.

वनराज आंदेकर याच्या सांगण्यावरून दुकानावर महापालिका अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकर यांनी खुनाचा कट रचला. त्यानंतर आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाड याची मदत त्यांनी घेतली. दरम्यान, गायकवाडचा साथीदार निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने नाना पेठेत खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाड आणि साथीदारांनी आंदेकरांचा खुनाचा कट रचल्याचे तपासात उघड झाले होते.

वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…

वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…

वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…

वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!