
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणात त्यांची बहीण, मेहुणा, भाच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात आरोपी संजीवनी कोमकर ही वनराज आंदेकर यांची बहीण तर जयंत हा मेहुणा आहे. कौटुंबिक वादातूनच वनराज आंदेकरची हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाला तेव्हा बहीण संजीवनी गॅलरीतच उभी होती आणि तिने हल्लेखोरांना चिथावणी दिली असा आरोप वनराज यांच्या वडिलांनी केला आहे. वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) रात्री नाना पेठेतील चौकात गोळीबार करण्यात आला. त्यानंतर कोयत्याने वार केले. हे वार वर्मी लागून वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला. जेव्हा हल्ला केला जात होता तेव्हा तिथेच गॅलरीत वनराज यांची बहीण संजीवनी थांबली होती. तिने हल्लेखोरांना चिथावणी देत, ‘मारा मारा, दोघांना सोडू नका’, असे ओरडून सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, वनराज आंदेकर यांच्या हत्येआधी पोलिस ठाण्यात वनराज यांची बहीण संजीवनी आणि जयंत कोमकर गेले होते. आकाश परदेशी याच्याशी वादानंतर तक्रार देण्यासाठी संजीवनी आणि जयंत कोमकर पोलिस ठाण्यात गेले असताना तिथे वनराज आंदेकर पोहोचले होते. त्यावेळी आकाश परदेशी आणि जयंत कोमकर यांच्यातला वाद वनराज यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हा बहीण संजीवनीने वनराज यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. ‘वनराज तुला आज पोरं बोलावून ठोकतेच,’ अशा शब्दांत संजीवनी कोमकर यांनी धमकी दिल्याचे वनराज यांच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. आरोपींना 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केल्या प्रकरणी आरोपी जयंत कोमकर आणि त्याचा भाऊ गणेश कोमकर यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

