वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची १ सप्टेंबर रोजी हत्या करण्यात आली असून, या प्रकरणी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याच्या संशय आहे, त्याची देखील चौकशी सुरू आहे. दरम्यान, आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या त्याचबरोबर त्यांच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आले. त्यांचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे.

वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार झाल्याच्या घटनेनंतर त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती देताना प्राथमिक वैद्यकीय परीक्षण अहवालामध्ये वनराज यांना गोळी लागली नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, त्यांच्या अंतिम शवविच्छेदन अहवालातून त्यांना दोन गोळ्या लागल्याचे समोर आले आहे. आंदेकर यांच्या गळ्यावर एक गोळी लागली होती, तर नाकावर दुसरी गोळी लागली होती. त्यांच्या अंगावर कोयत्याचे 24 वार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ससून रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालात वनराज आंदेकर यांना दोन गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, त्यांच्यावर 15 नाही तर तब्बल 24 वेळा कोयत्याने वार झाले असल्याचे नमूद केल्याची माहिती समोर आली आहे. या हत्याप्रकरणात पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासात आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. ही पिस्तुलं आरोपींनी मध्य प्रदेशातून आणल्याचा खुलासा देखील समोर आला आहे, तर या हत्येमागे सोमनाथ गायकवाड याचा हात असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. आंदेकरांची बहीण, बहिणीचा नवरा, भाचा यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…

वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…

वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…

वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…

वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…

सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…

वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…

वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…

पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…

पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!