कडाक्याच्या थंडीमुळे रुम हिटर लावला अन् 6 जणांचा होरपळून मृत्यू…

नवी दिल्ली : राजधानीत कडाक्याच्या थंडीमुळे रात्रीच्या वेळी घरात हिटर लावला आणि कुटुंब झोपेत असतानाच घराला आग लागली. या घटनेत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, संपूर्ण कुटूंब उद्धवस्त झाले आहे. मृतांमध्ये २ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.

दिल्लीच्या पीतमपुरा भागात ही घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या घरातील वरच्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग काही क्षणात पसरली आणि संपूर्ण घराला आगीने वेढले. यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग हिटरमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पण, तोपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला होता. घरात लाकडाचे साहित्य जास्त असल्याने आग वेगानं पसरली आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. मात्र, ही आग वेगाने पसरली. सहा जणांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…

Video: मुंबईत इमारतीला भीषण आग; दोन जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबईमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू…

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!