
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
पुणे : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी (ता. १) नाना पेठेत गोळीबार करण्यात आला.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वनराज आंदेकर यांची हत्या ही कौटुंबीक वादातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता पोलिस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आंदेकर टोळीची पुण्यात मोठी दहशत आहे. त्यामुळे वनराज आंदेकर यांची हत्या टोळीचा बॅकबोन म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. एक महिन्यापूर्वीच वनराज आंदेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सोमनाथ गायकवाड याने आंदेकर यांच्या हत्येचा कट रचला. आरोपी सोमनाथ गायकवाड याची याच भागात टोळी असल्याने आंदेकर आणि गायकवाड यांच्या वादातून बदला घेण्याच्या हेतूने ही हत्या झल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घरगुती वाद आणि टोळी युद्ध यामुळेच वनराज आंदेकर यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे पुण्यात आता पुन्हा एकदा टोळी युद्ध सुरू होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात काही आरोपींना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…
पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…
पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पुणे शहरात थरार! सराफा व्यावसायिकावर गोळीबार अन् दागिने लुटले…
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
Video: शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडची पोलिसांनी काढली धिंड…

