Video: पुणे पोलिसांच्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात कार्यक्रमांची मेजवानी..

पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी असून, पुणेकरांनी त्याचा लाभ घेत आहेत. पहिल्या दिवशी विविध शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

पोलिस आणि नागरिक यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध दृढ व्हावेत, या उद्देशाने पुणे पोलिसांतर्फे आयोजित ‘तरंग-२०२३’ मेळाव्याला शुक्रवारी (ता. २२) जल्लोषपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते मेळाव्याचे उद॒घाटन झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक निकेत कौशिक, प्रभारी पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, रंजनकुमार शर्मा यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

महिला, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत जनजागृती होण्यासाठी ‘महिला सुरक्षा’ लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. प्रारंभी पोलिस हवालदार नितीन जगताप यांनी गायलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.

२४ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रम असणार असून, ते सर्वांसाठी मोफत आहेत. प्रदर्शनात खाद्य स्टॉल, खादी, दागिने, देशी पदार्थ, विविध कलाकृती, शालेय विद्यार्थ्यांसाठी खेळप्रकार, ‘गुड टच, बॅड टच’ असे प्रबोधनपर मार्गदर्शन, मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्रा आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नागरिकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शहर पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे.

kashmir
kashmir

दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी रात्री या प्रदर्शनास भेट दिली. या वेळी त्यांनी पुणे पोलिसांकडून आयोजित ‘तरंग-२०२३’ कार्यक्रमाचे कौतुक केले.


तरंग-२०२३ पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!