
आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे : आंदेकर आणि कोमकर या दोन टोळ्यांमध्ये असलेल्या वादात राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकर यांचा भाचा आयुष कोमकर (वय २०) याची हत्या झाली. पण ही हत्या होईल असा अंदाज पोलिसांना नव्हता, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत खुद्द पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कबुली दिली. यापुढे गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार असा इशाराही पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘दोन टोळ्यांच्या वादातून स्वतःच्या नातवाची किंवा बहिणीच्या मुलाची हत्या केली जाईल असा अंदाज पोलिसांना नव्हता. आता गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी त्यांच्यावर कारवाई करणार. कोणत्याच गँगला आणि गँगस्टरच्या चुकीला माफी नाही.” आयुष कोमकर याची हत्या ही टोळी युद्धातून झाली असून, याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
पुण्यात सर्वत्र गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असताना त्याच्या आदल्या रात्री आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. आयुष कोमकर क्लासवरून परत आल्यानंतर बिल्डिंगच्या खाली त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गेल्या वर्षी, 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादीचा नगरसेवक वनराज आंदेकरची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीवनी कोमकर, पती जयंत कोमकर आणि तिचा दीर गणेश कोमकर सध्या तुरुंगात आहेत. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर गँगने आयुष कोमकरची हत्या केली.
वनराज आंदेकरच्या हत्येचा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने प्लॅन केला होता. त्यांनी कोमकर टोळीमधील काही लोकांची रेकीही केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी आंदेकर गँगमधील गुंडांना अटक केली आणि त्यांचा प्लॅन फसला. पण त्याच्या चारच दिवसानंतर आंदेकर गँगकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आली आहे.

पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

