
आंदेकर X कोमकर! आयुषच्या पार्थिवाला अग्नी देताना बाप ढसाढसा रडला तर हातामध्ये…
पुणे: पुणे शहरातील नाना पेठेत टोळीयुद्धातून हत्या करण्यात आलेल्या आयुष कोमकर याच्यावर सोमवारी (ता. ८) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील गणेश कोमकर यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहातून आणण्यात आले होते. त्यावेळी मुलाचा मृतदेह पाहून गणेश कोमकर धाय मोकलून रडला. शिवाय, आयुषने पाठवलेले ग्रिटिंग कार्ड हातामध्ये होते. यावर ‘आय लव्ह यू पप्पा’ असा मजकूर लिहला होता.
नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये 5 सप्टेंबरला रात्री आठ वाजता 9 गोळ्या झाडून अवघ्या आयुषची (वय १९) हत्या करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर गणेश विसर्जन असल्याने कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात ठेवला होता. अखेर सोमवारी संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
एक वर्षभरापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली होती. या हत्येचा बदला म्हणून आंदेकर गँगने आयुष कोमकर याला गोळ्या घालून ठार मारले. गणेश कोमकर, जयंत कोमकर आणि संजीवनी कोमकर हे वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील आरोपी आहेत. ते सध्या न्यायालयीन कोठडी असून त्यांना नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. काल गणेश कोमकरला मुलाच्या अंत्यविधीसाठी पॅरोलवर सोडण्यात आले होते.
आयुष कोमकरच्या अंत्यसंस्कारावेळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. या बंदोबस्तात गणेश कोमकरला स्मशानभूमीत आणले. त्यावेळी गणेश कोमकरने आयुषने त्याला पाठवलेले एक ग्रिटिंग कार्ड सर्वांना उंचावून दाखवले. गणेश कोमकर हा पोलिसांच्या गाडीतून उतरला तेव्हा त्याच्या हातात आयुषने पाठवलेले ग्रिटिंग कार्ड होते. यावर ‘आय लव्ह यू पप्पा’ असा मजकूर लिहला होता. गणेश कोमकर हा जेलमध्ये शिक्षा भोगत असताना आयुषने आपल्या वडिलांना हे ग्रिटिंग कार्ड पाठवले होते. स्मशानभूमीत आयुषचा मृतदेह पाहून गणेश कोमकर ढसाढसा रडला. या सगळ्यात त्याची काही चूक नव्हती. काही चूक नसताना माझ्या मुलाला शिक्षा भोगावी लागली, असे गणेश कोमकर रडत म्हणाला. यावेळी सर्व कोमकर कुटुंबीयही रडत होते.
हातात पत्र, डोळ्यात पाणी गणेश कोमकर तगड्या बंदोबस्तात लेकाच्या अंत्यविधीला#punenews #Crimenews #vanrajandekar #ayushkomkar #PuneCrimeNews #punepolice #ganeshkomkar pic.twitter.com/tUBjcY1jU3
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 9, 2025
दरम्यान, पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्यासह सहा जणांना अटक करण्यात यश मिळवले आहे. पोलिसांनी कालच बंडू आंदेकर याच्यासह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली. बुलढाणा या ठिकाणी पळून जात असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची माहिती समोर आली आहे.

आंदेकर X कोमकर! आयुष कोमकरचा ससूनच्या शवागारातील मृतदेह बाहेर काढणार…
आंदेकर X कोमकर! गुन्हेगारांच्या सात पिढ्या लक्षात ठेवतील अशी कारवाई करणार: पोलिस आयुक्त
पुणे! आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल…
वनराज आंदेकर यांची हत्या पुर्वनियोजित कट; पाणीपुरी खात पाळत ठेवली…
वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई…
वनराज आंदेकर हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट; हत्यारे पुरवणारा आरोपी…
वनराज आंदेकर यांच्या गळ्यावर 15 नाही तर तब्बल 24 कोयत्याचे वार अन्…
वनराज आंदेकर यांच्या वडिलांचा लेकींना सवाल; आता मी बदला…
वनराज आंदेकर यांच्या हत्येचे खरं कारण समोर…
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून 13 जणांना उचललं…
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला होताना बहिण गॅलरीतून म्हणाली; मारा, मारा, सोडू नका…
वनराज आंदेकर! पोलिस तपासात खुनाची दुसरी बाजू समोर…
सूडचक्र! पुणे शहरातील आंदेकर कुटुंबाचा पाच दशकांचा रंक्तरंजीत इतिहास…
वनराज आंदेकर! शत्रूला हाताशी धरून केली गेम, बहिणींना अटक…
वनराज आंदेकर! तुला जगु देणार नाही; पोर बोलावुन ठोकतेच…
Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

