
अजित पवार यांना नडणाऱ्या IPS अंजली कृष्णा आहेत कोण…
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर फोनवरुन दादागिरी केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आणि माध्यमांत हे वृत्त झळकल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अजित पवार यांना अडचणीत आणणाऱ्या सोलापुरातील कुर्डू येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी तक्रार दिली होती.
कुर्डू गावातील मुरुम उपसा करताना महिला पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा यांनी अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांना फोन लावून कारवाई थांबवण्याची विनंती केली होती. त्यावेळी, अजित पवार यांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्याला कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो, असे म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठल्याने आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र, त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात, मेरे फौन पर कॉल करें.. त्यावर अजित पवार म्हणताहेत.. की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी.. मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवार यांनी व्हिडीओ कॉल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून अजित पवार यांच्याशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात.
कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा…
1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या
2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर
3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी
4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी
6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण
7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका
8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई
9. याच कारवाईसंदर्भात अजित पवार यांच्याशी बोलताना ठाम भूमिका
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही.
त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ काॅलच केला.#ajitpawar #AnjaliKrishna pic.twitter.com/ag2DNuf3do— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) September 2, 2025
Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!
52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

