
नाशिक! खरातला वाचवण्यासाठी पोलिसांनीच फिल्डिंग लावली होती का…
नाशिक : नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. त्याचे कारनामे आता समोर येत आहेत. भोंदू कॅप्टन खरातविरोधात वर्षभरापूर्वीच तक्रारी आल्या. मात्र, पोलिसांकडून त्यावर कारवाई झाली नसल्याचे म्हटले जात आहे.
राजकारणी मंडळींसोबत पोलीस दलातील बडे अधिकारीदेखील आरोपी अशोक खरात याने आपल्या जाळ्यात ओढल्याची चर्चा रंगली आहे. खरातला वाचवण्यासाठी पोलिसांनीच फिल्डिंग लावली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी एक फोटो पोस्ट करत मोठा आरोप केला आहे. वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात यांचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी हा फोटो ट्विट आणि फेसबुकवर शेअर करत नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नाशिकचे IG दत्तात्रय कराळे यांच्यासोबत कॅप्टन अशोक खरात याचा फोटो मला प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी खरातवर गुन्हा का दाखल झाला नाही? याचे उत्तर या फोटोत दडलेले असावे. नाशिक परिक्षेत्राचे IG स्वतः कराळे असल्याने खरातला पाठीशी घातले गेले, अशी माहिती मला फोनवरून मिळाली आहे.”
देसाई यांनी पुढे संताप व्यक्त करताना म्हटले की, महिलांबाबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असे पाठीशी कसे घालू शकतात? हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशोक खरात यांच्यावर यापूर्वी गंभीर आरोप झाले होते, मात्र त्यावर कारवाई का झाली नाही, याबाबत आता संशयाचे धुके गडद झाले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबतचा फोटो समोर आल्याने ‘वरदहस्त’ कोणाचा, अशी चर्चा नाशिक विभागात सुरू झाली आहे. या प्रकरणाने पोलीस दलाची प्रतिमा मलिण होत असल्याचा आरोपही होत आहे. अद्याप यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
अशोक खरात नाशिक पोलिसांना म्हणाला, तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर…
नाशिक! अशोक खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; कुंडली येणार समोर…
नाशिक! कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न समोर; मी कृष्ण अन् तू माझी राधा…
नाशिक! कॅप्टन अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; घबाडंच हाती…
नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिकच्या कॅप्टन खरात या भोंदूबाबाची IPS तेजस्वी सातपुते करणार चौकशी…
नाशिक! महिला पाठमोरी उभी अन् अशोक खरातकडून गैरवर्तन; तू माझी प्रेयसी झाली नाही तर…
कॅ. खरातच्या केबिनबाहेर रांगा अन् तो महिलेसोबत चाळे करण्यात गुंग; 58 आक्षेपार्ह Video…
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

