
कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…
कोल्हापूरः कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील टाकवडेत एका शिक्षकाला नातेवाइकांनी महिलेच्या घरी शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी रंगेहाथ पकडले. संतापलेल्या नातलगांनी त्याला बेदम मारहाण करीत दोरीने बांधून घरातच बंद केले. पोलिसांनी त्या शिक्षकाला रात्री साडेदहाच्या सुमारास ताब्यात घेतले. या संपूर्ण घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इचलकरंजीतील एका प्रसिद्ध शाळेत कार्यरत असलेल्या या शिक्षकाचे संबंधित महिलेसोबत बरेच दिवस संबंध असल्याचा संशय घरच्यांना होता. अखेर, नातेवाइकांनी रंगेहाथ पकडले. महिलेच्या घरी आल्याचे पाहताच घरच्यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली आणि नग्न अवस्थेत बांधून ठेवले. परिसरातील नागरिकांनी घरासमोर गर्दी केली. काही नागरिकांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण, महिलेच्या नातलगांनी गुन्हा दाखल करण्यावर ठाम भूमिका घेतली.

दरम्यान, वाढत्या जमावामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली. तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी शिक्षकाची सुटका करून त्याला पोलिस ठाण्यात सुरक्षितरित्या हलवले. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
कॉलेजच्या लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा सापडला; विद्यार्थ्याला रंगेहाथ पकडले…
प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…
पुणे! बायकोला प्रियकारासह रंगेहात पकडलं अन् दोघांनाही जागेवरच संपवलं…
Video: प्रियकरासोबत बेडवर असताना नवऱ्याने पकडले रंगेहात…
नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…

